तनिष्का पोहचल्या साडेचार लाख स्त्रियांपर्यंत

null

बाई शिकली की घर शिकतं, समाज बदलतो हे लक्षात घेऊन ग्रामीण स्त्रियांच्या हातात स्मार्ट फोन, टॅबसारखी डिजीटल आयुधे दिली. डिजीटल साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी दहावी, बारावी झालेल्या , जरा बोलक्‍या, धीट स्त्रीची इंटरनेट साथी म्हणून निवड करण्यात येते. ती रहात असलेल्या जवळच्या चार गावांचा गट ( क्‍लस्टर) करून किमान सातशे स्त्रियांना डिजीटल साक्षर करण्याचे उद्‌द्‌ष्ट असते. आरोग्य, पाणी, स्वच्छतागृह, वृक्षारोपण अशा विविध चळवळीत ठसा निर्माण करणाऱ्या तनिष्का सदस्यांपर्यंत टाटा ट्रस्ट 2017 मध्ये पोहचले.

सुमारे 832 तनिष्का राज्यातील 32 जिल्ह्यात “इंटरनेट साथी ‘ महणून काम करीत आहेत. सुमारे साडे चार लाखांहून जास्त ग्रामीण स्त्रियांना इंटरनेटची ओळख त्यांनी करून दिली. टाटा ट्रस्ट आणि गुगलतर्फे मिळणाऱ्या दोन दिवसांच्या प्रशिक्षणामुळे साथीचा जणू कायापालट होते. गुगलतर्फे मिळालेले टॅब आणि स्मार्ट फोन घेऊन आपापल्या गावात परतणाऱ्या “तिच्या’कडे कुटुंबीयही आश्‍चर्याने पाहतात. तिला कशाला स्मार्ट फोन, तिला काय कळतं, अशी हेटाळणी सोसलेल्या साथी मग हुशारीने वागतात. अभ्यासाच्यावेळी मुलगा मोबाईलवर गेम खेळतोय, हे त्यांना समजायला लागले.टाटा ट्रस्टच्या या प्रकल्पाच्या प्रमुख नेहा बडजात्या यांच्यामते डिजीटल साक्षरता करणे ही अडथळ्यांची शर्यत होती. स्मार्ट फोनचा अभाव, नेटवर्क नसणे याबरोबरच स्त्रियांच्या हातात तंत्रज्ञान न देणे हा मानसिकतेचा मुख्य अडथळा होता. ती शर्यंत देशभरातील हजारो साथींनी आता जिंकलीय. गावागावात तनिष्का म्हणून काम करणाऱ्या इंटरनेट साथींनी काम करताना सुरवातीची भाषेची भीती व्हॉइस सर्चने घालवली. जग आपल्या मुठीत आलंय, हे दाखवणारे रंजक व्हिडिओ अन्य स्त्रियांना दाखवले. रांगोळी, ब्लाउजच्या फॅशन, पाककृती, इमिटेशन ज्वेलरी कशी बनवायची ते दाखवले . फोन हातात देऊन सेटींगपासून डेटा पॅकपर्यंतची माहिती लाखो स्त्रियांना (लाभार्थीं) दिली. त्यासाठी अपार कष्ट घेतले. शेतात जाऊन तिथेही माहिती दिली. संध्याकाळी-भल्या पहाटे गाववाटा मळवल्या. चार गावांमध्ये सतत गेल्यामुळे साथींचे संपर्क जाळे भक्कम झाले.

लाभार्थी आणि साथींनी मिळून इंटरनेटच्या माध्यमातून विविध माहिती घ्यायला सुरवात केली. फॅशन, शेतीतील कामे, सरकारी योजना, कायदे, नवे अभ्यासक्रम, रोजगाराच्या संधी, मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा तेही हातातील स्मार्ट फोन सांगू लागला. कलाकौशल्याच्या वस्तू बनवायला शिकल्या. विशेष म्हणजे आत्मविश्‍वासाबरोबर अर्थाजनाच्या संधी मिळाल्या. ग्रामीण भागातील आर्थिक-सामाजिक बदलाची ही नांदी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

*