सकाळ माध्यम समूह

१९३२ साली स्थापन झालेला सकाळ माध्यम समूह हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्वतंत्र माध्यम व्यवसाय आहे. विद्येचं माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरात ‘सकाळ’ चे मुख्यालय आहे. मराठी आणि इंग्रजी या भाषांमध्ये वर्तमानपत्रांची निर्मिती आणि महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये त्यांचे वितरण सकाळ माध्यम समूहाद्वारे केले जाते. डिजिटल माध्यमे, व्यावसायिक छपाई, इव्हेंट मेनेजमेंट अशा इतर व्यवसायांसोबतच सकाळ समूहाची ‘साम’ ही प्रादेशिक दूरचित्र वाहिनी देखील आहे.

गेली अनेक वर्षे सकाळ ने सामाजिक उपक्रमांना दिशा दिली आहे. यातले अनेक उपक्रम हे प्रसंगी प्रादेशिक हिताच्या पल्याड जाऊन, देशाच्या गरजा पूर्ण करणारे ठरले आहेत. सामाजिक बदल आणि सामाजिक भान ही मूल्ये सकाळ माध्यम समूहासाठी आजही महत्वाची आहेत. या मूल्यांमधूनच ‘उत्तरे शोधणारी पत्रकारिता’ तसेच ‘समाजाशी भावनिक नाते’ या संकल्पना पुढे आल्या आहेत.

सुमारे ३५०० पेक्षाही जास्त कर्मचारी आणि २५००० पेक्षाही जास्त सहकारी असलेल्या सकाळ माध्यम समूहात लोकांना कायमच प्राधान्य दिले जाते. मुक्त वातावरण आणि सतत नवीन शिकण्याची संधी उपलब्ध होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या प्रगतीला ते पोषक ठरते. सकाळ माध्यम समूहाचे सर्व उपक्रम हे सामाजिक गोष्टींना प्राधान्य देत राबवले जातात.