ध्येय:
बदलाच्या प्रक्रियेच्या मुळापर्यंत महिलांना नेणे, त्यांना समाजात मानाचे स्थान प्राप्त करून देणे आणि त्यांची सामाजिक व आर्थिक प्रगती घडवून आणणे.
मूल्ये:
सकाळ माध्यम समूहाची विचारसरणी ही सकाळ ट्रिनीटी आणि एस टी-७ ह्या मॉडेल मधून प्रतीत होते. ह्या मॉडेल मध्ये अभिप्रेत असणाऱ्या ७ निकषांची पूर्ती केल्याशिवाय तनिष्का व्यासपीठ कोणताही उपक्रम राबवत नाही.
एखादा प्रस्तावित उपक्रम हा प्रथम त्यामुळे घडून येणारा सामाजिक प्रभाव आणि तो उपक्रम करण्याची पद्धत या निकषांवर जोखला जातो. उपक्रम राबवल्यास समाजात काय सकारात्मक बदल घडेल, हे एकदा ठरवल्यावर प्रत्यक्ष काम करताना या उपक्रमाशी संबंधित सर्व व्यक्ती अथवा संस्थांना यात सामील करून घेणे अपेक्षित आहे. उपक्रमामध्ये संबंधित सगळ्यांचा सर्वतोपरी सहभाग आणि सहमती आवश्यक आहे. प्रत्यक्ष कामाच्या पद्धतीत पारदर्शकता आणि बांधिलकी असणे आवश्यक आहे, आणि त्याचसोबत कुठलेही प्रत्यक्ष काम हे कायद्याच्या चौकटीत राहून करणे गरजेचे आहे.