तनिष्का सभासद व्हा

तनिष्का व्यासपीठामध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील महिलांचा सहभाग अपेक्षित आहे. वय, व्यवसाय, शिक्षण, भाषा याच्यातील कुठलाही अडसर न बाळगता महिलांनी यात सहभागी व्हावं.

तनिष्काच्या माध्यमातून खालील गोष्टी साध्य होतील:

  • शिक्षण आणि सहकार्याला प्रवृत्त करणारे वातावरण
  • विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी व्यासपीठ
  • जनसंपर्काची उत्तम संधी
  • वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन समृद्ध करणे
  • समाज घडवणे
  • स्वतःचा आणि स्वतःतील नेतृत्वगुणांचा विकास
  • महिलांना पाठबळ देणारी ‘सपोर्ट सिस्टीम’
  • सामाजिक प्रतिष्ठा आणि वैयक्तिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने, स्वतःला भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करता येईल असे मोकळे आणि सुरक्षित वातावरण.
  • या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तनिष्का व्यासपीठाचे सर्व महिलांना आमंत्रण!

    तनिष्का सदस्या होण्यासाठी ९२२५८००८०० वर फोन करा!