पुणे, सामाजिक प्रश्र्न सोडवताना, समाजाप्रती बांधिलकी जपताना त्या सगळ्याजणी

null

एकत्र येतात. एकत्र येण्याने प्रश्र्न तर सुटतोच, एकमेकींच्या सोबतीने त्यांचा हुरूप- आत्मविश्वास वाढतो. तनिष्का व्यासपीठाच्या कामातून त्यांचा भगिनीभाव वाढतो. सांगली-कोल्हापूरच्या महापुराच्यावेळी याच नात्याने तनिष्का सदस्या मदतीसाठी पुढे आल्या. सोशल मिडियामुळे कोणत्या वस्तुंची गरज आहे, हे जसे समजले, तसे मदतीचे मार्ग शोधता आले. बघता बघता ट्रकभरून वस्तू जमा झाल्या. कोणी सणाचा खर्च कमी केला. कोणी मुलांचे वाढदिवस साजरे केले नाहीत. पुणे जिल्ह्यातील तनिष्कांनी तर पहिल्या टप्प्यातील मदतीत खाद्यपदार्थ तयार करून पाठवले. संसारोपयोगी वस्तूंचे संच तयार केले. त्याआधी पुण्यातील सुमारे दीड हजार पूरग्रस्तांना तनिष्का सदस्यांनी कपडे आणि ब्लॅकेट , संसारोपयोगी वस्तू दिल्या. येरवडा आणि वाकडे वाडी येथील शाऴांमध्ये जाऊन तनिष्कांनी गरजूंपर्यंत मदत दिली. अनिता कामठे (कोंढवा), शीतल कुंभार (अप्पर इंदिरा नगर), वैशाली झोरे (नसरापूर) विद्या कोतवाल (भोसले नगर), शीतल शितोळे, राधिका घोडके (सांगवी), नम्रता दुपारगुडे (मंगळवार पेठ), संगीता जगताप, अनिता पाटकर, दीपा बारटक्के , नीना तांबे, ज्योती सूर्यवंशी (कोथरूड), रक्षा तंवर, माया जोशी (सुखसागरनगर), सुषमा पलंगे, दीप्ती आणि मनीषा भगवान, रूपाली अभंग (धनकवडी), सविता झाल्टे, अनिता जाधव, जयश्री घाडगे (बिबवेवाडी), पद्मा बांदेकर (दत्तनगर) आणि सीमा तनपुरे (भोर) आणि सुलभा क्षीरसागर (येरवडा), सीमा पांचाल आदी तनिष्का सदस्यांनी खिद्रापूर (जि. कोल्हापूर) येथील पूरग्रस्तांसाठी मोठ्या आत्मीयतेने मदत पाठवली. तसेच पुण्यातील पूरग्रस्तांना पाठबळ दिले. तेथील मुलांना पुस्तकेही दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

*