तनिष्कांच्या एलएडीच्या माळांचा कायमच लखलखाट

पुणे : सण -समारंभात झगमगणाऱ्या एलईडी दिव्यांच्या माळा
भारतीय बनावटीच्या बनवाव्यात, असा प्रयत्न गेल्या अडीच- तीन वर्षांपासून
तनिष्का सदस्या करीत आहेत. त्यातून 25 ते 30 लाखांची उलाढाल
राज्यभरातील तनिष्कांनी केली आहे. या माध्यमातून उद्योजकतेच्या
वाटेवरचं जणू पहिलं पाऊलच उचललं आहे.

. या उपक्रमाची सुरवातच स्वदेशी वस्तू वापरण्याच्या संकल्पातून झाली.
अडीच-तीन वर्षांपूर्वी भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी वस्तुंचा
वापर वाढवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याच
सुमाराला इम्पोर्ट सबस्टिट्यूशन फौंडेशन आणि सकाळचे अध्यक्ष प्रतापराव
पवार यांनी तनिष्कांसाठी एलईडी माळांसाठीच्या आवश्यक प्रशिक्षणाला
चालना दिली. .तनिष्का व्यासपीठातर्फे सुरवातीला पुणे शहर आणि जिल्ह्यात
सदस्यांना प्रशिक्षण दिलं. त्यातून 50 हून अधिक तनिष्का चांगल्या प्रशिक्षक
झाल्या. त्यांनी पुढे राज्यभरातील इतर तनिष्का सदस्यांना माळा बनवायला शिकवल्या.
बाजारपेठेची स्थिती, तांत्रिक माहिती, प्रत्यक्ष प्रशिक्षण, असेम्बली प्रकिया , सराव,
अशा टप्प्याने प्रशिक्षण देण्यात आलं. , थोडी आर्थिक सुबत्ता असलेल्या इतर तनिष्का
सदस्यांनी माळा बनवणाऱ्या सदस्यांना पाठबळ दिलं. पालघर, लातूर
जळगाव, यवतमाळ, नवी मुंबई, नांदेड, सांगली, ठाणे,
कोल्हापूर, नागपूर आणि पुणे आदी ठिकाणी एलईडी दिव्यांच्या
माळा बनवून घरखर्चाला हातभार लावणाऱ्या , कौशल्य , क्षमता
वाढवणाऱ्या तनिष्कांची संख्या दोन हजारापेक्षा जास्त आहे.
तनिष्कांनी बनवलेल्या माळांचं वैशिष्ट्य म्हणजे चिनी बनावटीच्या माळांपेक्षा
त्या गुणवत्तेत सरस आहेत. अधिक टिकाऊ तसेच विविध आकारातही आहेत.
माळांची दुरूस्तीही तनिष्का करून देत असल्यामुळे चिनी माळांप्रमाणे
यूज अॅन्ड थ्रो नाही.

..तर कोट्यवधी रूपयांची आयात  वाचेल

भारतीय बनावटीचा असेल, यावर तनिष्कांचा कटाक्ष असतो, पण एलईडी दिवे
नाईलाजाने तैवानमध्ये बनवलेले घ्यावे लागतात. आपल्याकडे लहान आकाराचे
(5-8 मिमी) दिवे मोठ्या प्रमाणात, रास्त भावात उपलब्ध नाहीत. चीन कंटेनर
भरभरून या पद्धतीचा माल स्वस्तात पाठवतो. उद्योजकांनी असे दिवे बनवले, तर
कोट्यवधींची आयात करावी लागणार नाही, असे प्रशिक्षक दीप शाह .यांनी
सांगितले.

व्याप्ती  वाढवूया ..

चिनी बनावटीच्या माळांना पर्याय म्हणून सुरू केलेल्या या कामाची
व्याप्ती वाढवता येईल. पुण्यात तनिष्का सदस्यांनी गणेशोत्सवासाठी
सुमारे तीस हजार दिव्यांच्या माळा तयार केल्या. राज्यातील
एकत्रित मागणी सुमारे तीन लाख आहे. त्यासाठी
भांडवलाची अडचण भेडसावते. स्थानिक उद्योजक, संस्था यांना
यासाठी मदतीचा हात देता येईल. ग्राहकांनीही या माळा खरेदीला प्राधान्य
दिलं, तर एक मोठा प्रकल्प उभा राहू शकतो. ट्रेन द ट्रेनर या पद्धतीने तनिष्का
बचत गटाच्या सदस्यांनाही शिकवतील. या प्रशिक्षणाची संख्या
( एकावेळी 10 ते 20 जणी) वाढवता
येईल. याशिवाय चिनी बनाटीच्या वस्तूंना पर्याय ठरणाऱ्या इतर
वस्तुंचे प्रशिक्षणही महिलांना देण्याची कोणाची तयारी असेल, तर ती
सामाजिक बांधिलकीच ठरेल. आपला सहभाग, सूचना आणि पाठबळ
देण्याची तयारी पुढील व्हाॅटस अप क्रमांकावर कृपया लेखी कळवा.
917447452332

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*